सरमळे गावचे ग्रामदैवत देवी सातेरी भगवती देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज बुधवारी 20डिसेंबर रोजी साजरा होत असून मंदिरात सकाळ पासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सकाळ पासूनच मंदिरात भाविकांची गर्दी होणार आहे सातेरी भगवतीला भरजरी वस्त्र सुवर्ण लंकरा सह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतरच मान मानकरी यांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरली जाणार.
दिवसभर साकडे घालणे नवस फेडणे आदि कार्यक्रमासह रात्रौ उशिरा सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार आहे व त्यानंतर उशिरा नाईक मोचेमाडकर दशावतार नाटय मंडळाचा नाटय प्रयोग होणार आहे.नवसाला पावणारी आणि माहेरवाशीण लेकिंची पाठीराखी असणाऱ्या या देवीच्या जत्रोत्सवास भाविकांची मोठी गर्दी असते.या जत्रोत्सव उपस्थीत राहण्याचे आवाहन देवस्थानकडून करण्यात आले आहे.










