चोरट्याने 60हजार रुपये लंपास केले
ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे गावठणवाडी येथील प्रल्हाद ऊर्फ प्रकाश गावकर यांच्या घरात चोरट्याने रात्रौ १२वाजताच्या सुमारास दरवाजा तोडून आत जात धाडसी चोरी करत ६००००रुपये ची रक्कम लंपास केली. गावठनवाडी मंडळाचा चव्हाठा महोत्सव सुरू असल्याने कार्यक्रम पाहण्यासाठी गावकर हे आपल्या पत्नीसह गेले होते. ही संधी साधत चोरट्याने बंद दरवाजा शिताफीने तोडून आत प्रवेश केला व समोरच्या दरवाजाला आतून कडी घातली व मागच्या बाजूस जात लोखंडी हत्यार आणत ट्रंक फोडला व त्यातील ६००००रुपये लंपास केले त्या पत्र्याच्या ट्रनक मध्ये मौल्यवान वस्तू होत्या मात्र त्या चोरट्याने न चोरता केवळ रोकड लंपास केली.
महोत्सव सुरू असण्याच ठिकाण हाकेच्या अंतरावर असल्याने तिथल्या मोठ्यप्रमाणावर असलेल्या आवाजाचा गलबलाटाचा फायदा चोरट्याने घेतला. येवढ्या जवळ कार्यक्रम सूरु असताना चोरट्याने ज्या अर्थी हे धाडस केले त्या अर्थी चोरटा हा सराईत नसून जवळपासचाच , या सर्वाची खडानखडा माहिती असणारा असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी गावातील अशाच एका कार्यक्रमाचा फायदा घेत चोरट्याने देवुळ वाडी येथे राजन गावकर याच्या घरी चोरी केली होती.त्यामुळे चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काबाड कष्ट मोलमजुरी करुन कमावलेले पैसे चोरीस गेल्याने गावकर कुटुंब पूर्णतः हादरले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.












