तिरंदाजीमध्ये रत्नागिरीच्या मानस मोरेला सिल्व्हर पदक

 

रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील एस.व्ही.जे.सी.टी. मैदान, डेरवण येथे तिरंदाजी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धेत रत्नागिरीच्या मानस मोरे याने १० वर्षे वयोगटात ३०० पैकी २०९ गुण मिळवून सिल्व्हर पदक पटकावले आहे. संपुर्ण स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांमध्ये मानस मोरे हा सर्वात लहान स्पर्धक म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे.

एस.व्ही.जे.सी.टी. मैदान, डेरवण येथे दि.१८ डिसेंबर रोजी तिरंदाजी असोसिएशनच्यावतीने जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील झोरेज् स्पोर्ट अकॅडमीमार्फत तिरंदाजीचे प्रशिक्षण घेणारा मानस मोरे या स्पर्धेत सहभागी झाला होता.संपुर्ण स्पर्धेत वयाने सर्वात लहान असल्यामुळे मानस मोरे सर्वाचेच आकर्षण बनला होता. त्याने अचूक निशाना साधत ३०० पैकी २०९ गु्ण मिळवून सर्वांची कौतूकाची थाप मिळविली. मानस मोरे याला झोरेज् अकॅडमीच्या समिधा झोरे या प्रशिक्षण देत आहेत.