कालजयी सावरकर पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय शौर्य सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांच्यावर आधारित निवडक कालजयी सावरकर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. २३) सकाळी १०.३० वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित केला आहे. या वेळी ज्येष्ठ लेखक, व्याख्याते, चरित्रकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यानही होणार आहे.

 

मुंबई तरुण भारत, पतितपावन मंदिर संस्था, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, एस. पी. महाजनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी जास्तीत जास्त विद्यार्थी, सावरकरप्रेमी, रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे यांनी केले आहे.