६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा  : रत्नागिरी केंद्रातून ‘श्रीरंग’ चे ‘तथास्तु’ प्रथम

राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरीचे ‘वॅट नाईट’ द्वितीय; स्वराध्या फाऊंडेशन, मालवणचे ‘एक्सपायरी डेट’ तृतीय 

मुंबई : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रातून श्रीरंग, रत्नागिरी या संस्थेच्या तथास्तू या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी या संस्थेच्या वॅट नाईट या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चिपळूण+मालवण वेंगुर्ला केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

स्वराध्या फाऊंडेशन, मालवण या संस्थेच्या एक्सपायरी डेट या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक भाग्येश खरे (नाटक-तथास्तू), द्वितीय पारितोषिक चंद्रशेखर मुळये (नाटक-वॅट नाईट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-एक्सपायरी डेट), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक- तथास्तू), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रशांत साखळकर (नाटक-देंटनाईट), द्वितीय पारितोषिक रॉबीन लोपीस (नाटक-कृष्णकिनारा), रंगभूषा प्रथम पारितोषिक उल्हेश खंदारे(नाटक-कोमल गांधार), द्वितीय पारितोषिक हेमंत वर्दम (नाटक-सावरबेट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गोपाळ जोशी (नाटक- तथास्तू) व शुभदा टिकम (नाटक-एक्सपायरी डेट), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रक्षिता पालव (नाटक- वाटेला सोबत हवी), अंकिता कुलकर्णी (नाटक- त्या तिघांची गोष्ट), मुक्ता शेंबेकर (नाटक-देंट नाईट), सोनल शेवडे (नाटक-तथास्तू), कांचन खानोलकर (नाटक- कृष्णकिनारा), शुभम कुशे (नाटक- परिघ) ,विवेक गोखले (नाटक- लॉलीपॉप), प्रदीप होडावडेकर (नाटक-कालचन्द्र), दीपक माणगांवकर (नाटक- वॅटनाईट), शरद सावंत (नाटक- कृष्णकिनारा)

दि. २५ नोव्हेंबर, २०२३ ते १८ डिसेंबर, २०२३ या कालावधीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण, मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण व नाटककार मधुसुधन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ला येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. नरेंद्र आमले, श्री. सुधीर सेवेकर आणि श्रीमती प्रतिभा नागपूरे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.