लाईफ केअर हॉस्पिटल आयोजित ए.एस्.जी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटपन्हाळे (वार्ताहर) लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि ए. एस. जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी ए.एस्.जी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी येथे करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला.

शिबिराच्या सुरुवातीस ए.एस्.जी इन्स्टिट्यूटचे संचालक जहूर बोट यांनी शृंगारतळीतील प्रतिष्ठित समाजसेवक गुलामभाई तांडेल यांच्याहस्ते लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण च्या सर्व डॉक्टर्स व त्यांचे सहकार्‍यांचे स्वागत केले. या शिबिराला अस्थिरोग व सांधेरोपण तज्ञ, नामवंत डॉक्टर हुजैफा इसहाक खतीब हे उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना या मोफत शिबिराचा लाभ मिळाला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ए.एस्.जी इन्स्टिट्यूट व लाईफ केअर हॉस्पिटल च्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. गोरगरीब रुग्णांनी मिळालेल्या या सेवेबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.