सिंधुदुर्ग साहित्य संघातर्फे डॉ. वसंत सावंत स्मृती साहित्य वाचक स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन आणि ग्रंथ चळवळीला प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय डॉ. वसंत सावंत स्मृती साहित्य वाचक स्पर्धेचे आयोजन रविवार ७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा विद्यार्थी गट ९ वी ते १२ वी आणि शिक्षक गट अंगणवाडी ते महाविद्यालय अशा दोन गटात होणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या २० स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. मला आवडलेले पुस्तक या विषयावर विद्यार्थ्यांना पाच मिनिटे तर शिक्षकांना सात मिनिटे वेळ दिला जाईल.

स्पर्धकांनी आपला सहभाग ३१ डिसेंबरपर्यंत नोंदवायचा आहे. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांकाला १००१ रुपये (ग्रंथ स्वरुपात) व प्रशस्तीपत्र, द्वितीय ७७७ रु. (ग्रंथ स्वरुपात) व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांकाला ५५५ रु. (ग्रंथ स्वरुपात) व प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ३३३ रुपये (ग्रंथ स्वरुपात) व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सहभागी स्पर्धकांनाही प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकांनी संस्था कार्याध्यक्ष विठ्ठल कदम ९८२३०४८१२६ या क्रमांकावर नावनोंदणी करावी. नोंदणीवेळी ज्या पुस्तकावर बोलणार त्या पुस्तकाचे नाव द्यावे. स्पर्धेच्या ठिकाणी सादरीकरणाची स्क्रिप्ट आणावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी आणि कार्यवाह मनोहर परब यांनी केले आहे.