लांजा (प्रतिनिधी) लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेली दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा व सन्मान लोककलेचा, गौरव नमन कलाकारांचा हा कार्यक्रम नुकताच आसगे मांडवकरवाडी येथे पार पडला.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती लांजा
योगेश कदम, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, आसगे सरपंच सौ. अनुष्का गुरव ,
सौ. स्वरूपाझ दाभोळकर (पोलीस पाटील आसगे), माजी पंचायत समिती सभापती सौ. लीला घडशी
नमन लोककला रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष पी. टी. कांबळे, लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा अध्यक्ष मोहन घडशी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे ,मंडळाचे अध्यक्ष मोहन घडशी आणि मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, कलेची देवता नटेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यानंतर मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारणी यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री पन्हाळेकर गुरुजी – लांजा, श्री दशरथ गुरव – देवधे, श्री संदीप सावंत – वाकेड यांचा मंडळाला पंच म्हणून सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा कार्यक्षेत्र लांजा, राजापूर,रत्नागिरी या मंडळाचे उपाध्यक्ष गजानन गंगाराम गुरव लांजा, हैदर अली पावसकर तळवडे, विष्णू धाडवे पाली पाथरट यांचा सत्कार करण्यात आला. आसगे मांडवकरवाडी चे ग्रामीण अध्यक्ष काशीराम गणू मांडवकर, मुंबई अध्यक्ष एकनाथ काशीराम मांडवकर, पुणे अध्यक्ष शांताराम तुकाराम मांडवकर, महिला प्रतिनिधी सौ संजीवनी संजय मांडवकर, पत्रकार, त्याचप्रमाणे नमन लोककला रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र महाराष्ट्र चे सदस्य, शाहीर विकास लांबोरे यांच्या आई वडील, शाहीर नितीन पवार व त्यांची संपूर्ण टीम, तसेच लांजा तालुक्यातील 39 नमन मंडळाचे प्रमुख व कलाकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष मोहन गोविंद घडशी – कुरणे, सचिव देवजी सोमा हरमले – देवधे, संस्थापक सदस्य चंद्रकांत धकटू पालकर -कुवे, जिल्हा कार्यकारणी सदस्य रविंद्र आकाराम कोटकर-गवाणे, त्याचप्रमाणे गजानन मारुती तटकरे – गवाणे यांचा विशेष वैयक्तिक सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे निमित्ताने व्यथा नमन कलाकाराची या गाण्याचे अनावर मंडळाच्या सहकार्याने व शाहीर नितीन पवार, शाहीर विकास लांबोरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मोहन घडशी, उपाध्यक्ष दिलीप आगरे, सचिव देवजी हरमले, खजिनदार चंद्रकांत गुरव, सहसचिव विनायक कुंभार, संस्थापक सदस्य चंद्रकांत पालकर, सदस्य गजानन तटकरे, आत्माराम धुमक, रविंद्र कांबळे, विष्णू मांडवकर, प्रकाश करंबेळे, रघुनाथ नामये, विलास मसणे, रविंद्र कोटकर यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र कोटकर व प्रस्तावना चंद्रकांत पालकर यांनी केली.












