शहाजी बापूंची सावंतवाडी शहरात दमदार एन्ट्री …
भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण हा महाराष्ट्राच्या काळजाचा घड आहे. इथला निसर्ग हा सर्वांनाच आवडतो. त्यावेळी ठाकरे यांनी माझ्यावर कोकणची जबाबदारी टाकली होती. त्यावेळी कोकणातील प्रत्येक गावनगाव मी पिंजुन काढले होते. राजु बेग यांना याची कल्पना आहे. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्यासाठी कॉलेजच्या पटांगणावर भव्य सभेसाठी मी आलो होतो. त्यामुळे कोकण आणि सावंतवाडीशी माझे जुने नाते आहे, अशा शब्दांत आ. शहाजी बापू पाटील यांनी कोकण बद्दल गौरवोद्गार काढले.
भाजपचे युवा नेते तथा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे दमदार नेते आमदार तथा काय झाडी, काय डोंगूर डायलॉग फेम शहाजीबापू पाटील शनिवारी सायंकाळी सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी बापूंचं गवळी तिठा इथं जंगी स्वागत केले. तसेच यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी शहाजी बापू पाटील यांनी भाजप नेते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या जगदंब निवासस्थानी भेट दिली. यावेळी संजू परब व सौ. संजना परब यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परब कुटुंबियांनी केलेल्या स्वागतान ते भारावून गेले.यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, अजय गोंदावळे, अनारोजीन लोबो, अशोक दळवी, नारायण राणे, राजू बेग, दिपाली भालेकर, अजय सावंत, बंटी पुरोहित, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, राज वरेरकर, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.
तर शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शहाजी बापूंनी भेट दिली. यावेळी त्यांच दीपक केसरकर समर्थकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी अनारोजीन लोबो, अशोक दळवी, नारायण राणे, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते. शहाजी बापूंच्या स्वागताला शहरातील बाळासाहेबांची शिवसेना-भाजपचे नेते एकत्र आल्याच पहायला मिळाले.
Sindhudurg