गाईची वाहतूक होत असल्यास तात्काळ कारवाई करा

शालेय विद्यार्थ्यांच्या बस फेऱ्यात कपात करू नका – आमदार नितेश राणे

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे गाईंची कत्तलीसाठी वाहतूक होते, तक्रार केल्यानंतर पोलीस दखल घेतात मात्र तत्पूर्वी पोलीस यंत्रणेने याबाबत जागरूक राहून याबाबत कारवाई करावी अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन सभागृहात मांडली. पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांनी याबाबत दखल घेत ही कारवाई निश्चितपणे होईल अशी ग्वाही दिली.

तर शालेय विद्यार्थ्यांच्या बस फेरीबाबत विद्यार्थ्यांच्या बस फेऱ्यात कपात होत असल्याबाबत व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानी बाबत आमदार नितेश राणे यांनी हा प्रश्नही गांभीर्याने मांडला. बसा तुटवडा असल्यामुळे व नव्या गाड्या नसल्यामुळे अडचण येत असल्याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र विद्यार्थ्यांच्या बसची कपात करू नये संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या बसलेल्या सुरळीत ठेवाव्यात असे आदेशही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.