सावंतवाडी वनविभागाच्यावतीने वन्य प्राण्यांसाठी उपायोजना
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी मानववस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात. तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असतात त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या शुभहस्ते सुनील लाड सहा. वनसंरक्षक व श्रीम. नेहा वानरे परिविक्षाधीन सहा. वनसंरक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज अशा जलद बचाव पथक RRT (Rapid Rescue team) ची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व वनक्षेत्रपाल श्री. कुंभार तसेच इतर वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वन्यप्राणी बचाव करणे बरोबरच या पथकाच्या मार्फत मनुष्यवस्ती नाजिक वन्यप्राणी यांच्या उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात RRT टीम मार्फत पिंजरे लावून वन्यप्राणी विशेषत माकड ,वानर यांना पकडून त्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.
तरी अश्या प्रकारे मनुष्यवस्तीत वन्यप्राणी आढळल्यास तसेच माकड वानर यांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांना या बाबतची माहिती तात्काळ विभागीय कार्यालय येथील RRT कंट्रोल रूम ला हेल्पलाइन क्रमांक +91 2363-272005 देण्यात यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.











