मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा ‘डंकी’ नुकताच रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी डंकीने केवळ 29 कोटींचा बिझनेस केला. तर दुसऱ्या दिवशी प्रभासचा ‘सालार’ रिलीज झाल्याने डंकीची हवा टाईट झाली आहे. कारण सालारने पहिल्याच दिवशी 95 कोटींचा गल्ला जमवत रेकॉर्ड केला आहे. शाहरुखचा ‘डंकी’ दुसऱ्या दिवशीपासूनच डगमगताना दिसतोय.
2023 हे वर्ष शाहरुखसाठी फार खास ठरलं. ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर ‘डंकी’ हा शाहरुखचा सलग तिसरा सुपरहिट ठरेल असा अंदाज होता. मात्र पहिल्या दोन सिनेमांच्या तुलनेत डंकीला फारसा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ‘डंकी’च्या कलेक्शन 30 टक्क्यांनी कमी झाले आहे. सिनेमाच्या एडव्हान्स बुकिंगनेच खरंतर कात टाकली होती. ‘डंकी’चं अॅडव्हान्स बुकिंग केवळ 15.41 कोटी झालं होतं. तर सिनेमाने भारतात पहिल्या दिवशी केवळ 29 कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी 20.50 कोटी कमावले. सध्या ‘डंकी’चं एकूण कलेक्शन 49.70 कोटी इतकं आहे. पहिल्या दिवशी जिथे सकाळी सहाचे शोही फूल झाले तिथे दुसऱ्या दिवशी 14 टक्के घट झाली. तर दिवसभरातील शोजमध्येही २ ते ३ टक्क्यांची घट दिसली. आता विकेंड कलेक्शनच ‘डंकी’ला तारु शकेल.











