नोएडा – उत्तर प्रदेशातील नोएडा इथं आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने दिली आहे. विवेक बिंद्रा यांनी पत्नी यानिकाला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप आहे. यानिकाला शिवीगाळ करत तिचा शारीरिक छळ विवेक बिंद्रा यांनी केल्याचे म्हटलं आहे.
तक्रारीनुसार, विवेक यांनी यानिकाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली. तिचा मोबाईल फोडून टाकला. या मारहाणीत यानिकाच्या कानाचा पडदा फाटका. त्यानंतर आता विवेक बिंद्राविरोधात नोएडा येथे गुन्हा दाखल झाला आहे. ६ डिसेंबरला विवेकचं यानिकासोबत लग्न झाले होते. त्यानंतर ८ डिसेंबरला ही मारहाणीची घटना घडली. त्यानंतर यानिकावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यानिकाचे भावाने १४ डिसेंबरला विवेक यांच्याविरोधात तक्रार दिली. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यात विवेक बिंद्रा सोसायटीच्या गेटवर पत्नीशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
विवेक बिंद्रा मोटिवेशनल स्पीच आणि सल्ला देण्याचे काम करतात. परंतु त्यांचा संसार सुरळीत चालवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांची पहिली पत्नी गीतिका सबरवाल यांच्यासोबतही त्यांचा वाद सुरू आहे. सध्या हा वाद कोर्टात आहे. गीतिकाने पती विवेककडून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप केला आहे. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात आहे. या दोघांना एक मुलगाही आहे. पहिल्या पत्नीच्या वादानंतर विवेकने यानिकासोबत दुसरे लग्न केले.











