
रत्नागिरी उत्तर कार्यकारिणीची बैठक संपन्न
रत्नागिरी : आज भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी तालुका कार्यकारिणी ची सभा पार पडली त्यात या बैठकीमध्ये रत्नागिरी उत्तर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून बैठकांचा धडाका लोकसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे. आजच्या बैठकीमध्ये तयार करण्यात आलेल्या सुपर वॉरियर्स ची अंतिम यादी करण्यात आली असून हे सुपर वॉरियर्स भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी प्रत्येक बूथ मध्ये काम करणार आहे. या सर्व भाजपच्या रणनीतीवरून भाजपा आगामी निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसते आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी पक्ष वाढी संदर्भात कश्या प्रकारे काम केले पाहिजे या बाबत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला विजयी कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी ‘अपना बूथ सबसे मजबूत ‘ प्रमाणे प्रत्येक बूथ वर ५१% च्या पुढे मत मिळाली पाहिजेत व राहिलेल्या १०० दिवसात सगळ्यांनी या साठी प्रयत्न करायचे आहेत असे सांगत भाजपा कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. सर्वत्र मतदारसंघामध्ये कशापद्धतीने काम करायचे आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या योजना आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तालुकाअध्यक्ष विवेक सुर्वे यांनी केले. या बैठकीस भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने तालुकाध्यक्ष विवेक सर्वे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











