कलमठ गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे शानदार स्वागत

अनेक शिबिरामध्ये ग्रामस्थांनी घेतला लाभ.

कणकवली :केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात, योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी देशभर विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे, आज कणकवली कलमठ गावात देखील विकसित भारत यात्रेचे आगमन झाले गावाच्या वतीने यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने विविध शिबिरांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजल्या पासून आयुष्मान भारत योजना, आधार कार्ड , आरोग्य तपासणी, रक्त तपासणी अश्या शिबिराचे देखील एकाचं दिवशी एकाच ठिकाणी आयोजन कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने आयोजन केल्याने गावातील लाभार्थीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्त तपासणी २१, आधार नोंदणी व दुरुस्ती ४१, आयुष्मान भरता योजनेच्या ४४ व आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थांना उपस्थित सर्व विभागांच्या प्रतिनिधींनी विविध योजनांची माहिती दिली.

त्या मध्ये गरोदर माता साठी मातृत्व वंदन योजना, प्रधान मंत्री किसान सन्मान,आरोग्याच्या आयुष्मान भारत, पिएमईजीपी अंतर्गत उद्योग, ग्रामीण रोजगार हमीचे शेतं गोठा, फळ लागवड योजना, आवास योजना, वैयक्तिक शौचालय, विश्वकर्मा योजना यांची माहिती दिली व लाभ घेतलेल्या लाभार्थीनी देखील यावर आपले मनोगत व्यक्त करत समाधान व्यक्त केले. यावेळी अधिकारी म्हणून सतिश जाधव कृषी अधिकारी. गीता पाटकर मुख्य सेविका महिला बालकल्याण ,काळू पवार केंद्रप्रमुख ,प्रमिला तांबे कृषी सहाय्यक उपस्थित होते, आधार साठी पलक संघवी, रक्त तपसणी सागर पेडणेकर, रुग्ण तपासणी सुविधा सावंत, स्मिता सावंत आयुष्मान भारत साठी अंकिता राणे, विभावरी कांबळे व आशा सेविकांनी मेहनत घेतली. उपस्थित मान्यवरांचे सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, दिनेश गोठनकर,प्रीती मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बुचडे सर यांनी केले.