रत्नागिरी : नवभारत नवराष्ट्र ग्रुपच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा कार्यक्रम दि २४ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथील सावंत पॅलेस हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता.
फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून रत्नागिरीतील चौगुले फोटोज च्या गुरु चौगुले यांना आदर्श छायाचित्रकार पुरस्काराने या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. फोटोग्राफी क्षेत्रात उत्तम दर्जा आणि उत्कृष्ट सेवा पुरवणाऱ्यांच्यात त्यांच नाव सर्वात आधी घेतले जाते. चौगुले फोटोज नावाने रत्नागिरी आणि गोव्यात त्यांच्या शाखा आहेत.
गुरु चौगुले हे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सध्या कार्याध्यक्ष सुद्धा आहेत. तसेच ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर संघटनेचे कोकण विभाग प्रमुख पद तसेच महाराष्ट्राच्या कार्यकारणीवर देखील त्यांनी काम केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा फोटोग्राफर संघटना स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी फोटोग्राफर साठी मोफत शेकडो कार्यशाळा तसेच विविध वेबिनार चे आयोजन केलेले आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून व व्यक्तिगत शेकडो सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी अल्पावधीतच यशस्वीपणे राबवलेले आहेत. फोटोग्राफर साठी विविध उपक्रम ते आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने नेहमीच राबवत असतात. नवतरुण ग्रुपच्या सर्वेक्षणातून फोटोग्राफी क्षेत्रात वेगळी ओळख केल्याबद्दल व त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत नवभारत ग्रुप च्या वतीने त्यांना राज्यमंत्री मा.उदयजी सामंत साहेब तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कीर्ती किरण पुजार साहेब यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय धनंजय कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते आदर्श छायाचित्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात नवभारत नवराष्ट्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











