कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली – बांधकरवाडी दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सव निमित्त २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त शनिवार २३ ते बुधवार २७ डिसेंबर पर्यंत दररोज स. ५.३० वा. काकड आरती, मंगळवार २६ रोजी सायं. ४ वा. हरिपाठ, सायं. ७ वा. श्रींची पाद्यपूजा, सायं. ७ वा. भजने, रात्रौ ११ वा. कीर्तन, रात्रौ १२ वा. श्री दत्तजन्म सोहळा व तिर्थप्रसाद त्यानंतर श्री भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, बुधवार २७ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यकामांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त प्रसादिक मंडळ – बांधकरवाडी यांनी केले आहे.












