पदवीधर शिक्षक शरद नारकर यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार

 

स्वप्निल कदम | वैभववाडी : शिक्षक नेते नाधवडे केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक शरद अर्जुन नारकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, लेखा अधिकारी बाळासाहेब पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर, श्री जे. डी. राणे आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी शरद नारकर यांच्या शिक्षण सेवेबाबत अभिनंदन केले. यावेळी सत्कार सोहळ्याला उज्वला नारकर, पायल नारकर, उपस्थित होते. शरद नारकर यांनी उपस्थितांचे तसेच जिल्हा परिषदेचे आवश्यक सहकार्य नेहमी लाभले त्याबाबत आभार मानले.