कणकवलीत सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई

कणकवली नगरपंचायत पथकाकडून ३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल

कणकवली : शहरात मंगळवारी आठवडा बाजारातील सिंगल युज प्लास्टिक वापरनाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, असून ३ हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई कणकवली नगरपंचायतच्या पथकातील विनोद सावंत, स्वच्छता निरीक्षक सिटी को – ऑर्डिनेटर वर्षा जाधव, प्रकाश राठोड, पूजा जाधव, संदीप तांबे यांच्या पथकाने केली. मंगळवारी आठवडा बाजारा दिवशी केलेल्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.