कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एस. एम. हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कणकवलीचा विद्यार्थी विवेक अनिल जाधव याने NEET-२०२५ परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परिक्षेत त्याने ७२० पैकी ४४३ गुण मिळवून ऑल इंडिया रैंक १३२६५७ तसेच Percentile ९९:९३% मिळवली. या यशामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला आहे.
शालेय शिक्षणातही विवेकने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दहावीत त्याला ८९.४०% तर बारावीमध्ये ८०.००% गुण मिळाले होते.
त्याचे वडील अनिल दिगंबर जाधव हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पंचायत समिती, कणकवली येथे कार्यरत आहेत. आई सौ. अनुजा अनिल जाधव या केंद्रशाळा, नाधवडे येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापिका आहेत. मोठा भाऊ गौरव अनिल जाधव हा B. Pharmacy व PGDM, पुणे शिक्षण पूर्ण करून पुढील कारकिर्द घडवत आहे.
विवेकच्या या यशाबद्दल त्याचे मित्र, नातेवाईक, शिक्षक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात तो यशस्वी डॉक्टर बनून समाजाची सेवा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











