गोळवण गावच्या विकासासाठी कटीबद्ध!

माजी खासदार निलेश राणे ; गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन शुभारंभ

मालवण | प्रतिनिधी : गोळवण गावावर राणे साहेबांचे विशेष प्रेम नेहमीच राहिले आहे. गोळवण गावाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासानिधी देणे ही आम्हा कार्यकर्त्याचीही जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ गाव विकासाची जी मागणी करतील ती पूर्ण करण्यासाठी निधी प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी गोळवण येथे बोलताना स्पष्ट केले.

गोळवण गावात भाजप युती शासनाच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ निलेश राणे यांच्या हस्ते रवळनाथ मंदिर परिसर येथे संपन्न झाला. यात डोंगरी विभाग विकास अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण निधी (10 लाख), जिप 20 टक्के सेस अनुदान मधून गोळवण ग्रापं कार्यालय ते बौद्धवाडी (समतानगर) जोडरस्ता (निधी 4 लाख), जिप स्वनिधी मधून जिप शाळा गोळवण नं 2 इमारत दुरुस्ती (निधी 3 लाख) या कामांचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला. अशी माहिती सरपंच सुभाष लाड यांनी दिली.

भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष आशिष हडकर, शक्ती केंद्र प्रमुख निलेश खोत, माळगाव बूथ अध्यक्ष गुरुनाथ परब, नांदोस उपसरपंच विजय निकम, माजी प. स. सदस्या सौ. सागरिका लाड, सार्वजनिक देवस्थान कमिटी अध्यक्ष आबा परब, सचिव नारायण परब, गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, सदस्य साबाजी गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर, बूथ अध्यक्ष आपा घाडी, प्रकाश चिरमुले, अजित गोळवणकर, मधुसूदन घाडी, दशरथ परब, संतोष चव्हाण, एकनाथ चव्हाण, सुहास घाडी, सत्यवान चव्हाण, सुंदर लाड, बाबुराव चिरमुले, संतोष गोळवणकर, अनिल चव्हाण, विठ्ठल सावंत, आनंद परब, पूर्णानंद नाईक, नंदादीप नाईक, प्रल्हाद नाईक, सतीश परब, नामदेव वरक, आनंद परब, दिपक गावडे, महेंद्र चव्हाण, अमित घाडी, अविनाश नाईक, आनंद परब, सत्यवान दाभोलकर, वामन लाड, रामकृष्ण नाईक, संजय पाताडे, विक्रांत नाईक, नारायण लुडबे यासह ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अशोक सावंत, बाबा परब यांनी विचार मांडले. निलेश राणे यांच्या मागणी पाठपुरावाव्यातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी मालवण कुडाळ तालुक्यात प्राप्त झाला आहे. यापुढेही विकासाची गती अशीच कायम राहील. असे सांगितले. तर अशोक सावंत यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. गेल्या नऊ वर्षात हा मतदारसंघ विकासकामात मागे गेला. जे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, आमसभा घेऊ शकत नाहीत ते जनतेला न्याय काय देणार. असा सणसणीत टोला लागावला. तर आता जनतेनेच ठरवले आहे यापुढे या मतदार संघांचे आमदार निलेश राणे हे निश्चित केले आहे. असा ठाम विश्वासही अशोक सावंत यांनी व्यक्त केला.

यावेळी सरपंच सुभाष लाड यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या तत्पर कार्यसेवेचा विशेष उल्लेख केला. गावात गॅस्ट्रो साथ आली तेव्हा एका दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. स्टाफ दिला. गावासाठी सातत्याने विकासनिधी दिला. गावच्या विकासात मंत्री नारायण राणे यांचे मोठे योगदान असल्याचे सुभाष लाड म्हणाले. तर त्याच पद्धतीने निलेश राणे या मतदारसंघात काम करत असून तेच भावी आमदार असल्याचे सुभाष लाड म्हणाले.

निलेश राणे यांनीही सरपंच सुभाष लाड व सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. विकसकामे ज्या गतिमान पद्धतीने गावात होतात त्याच पद्धतीने प्रत्येक निवडणुकीत गाव पक्षाला मताधिक्य देतो. त्यामुळे आमचीही जबाबदारी गावाच्या विकासाला मागेल तो निधी मिळवून देणे हीच आहे. येथील कोणी आमदार मंजूर काम नामंजूर करू शकत नाही, कोणाची हिम्मत नाही. आम्ही गावाला सर्व विकसकामे मंजूर करून देण्यासाठी तत्पर आहोत. गाव व ग्रामस्थ सांगेल तोच विकास, तेच विकासकाम गावात होणार. गेल्या वर्ष भरात राज्य व केंद्र सरकार माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी मालवण कुडाळ मध्ये प्राप्त झाला. यापुढेही होईल, असे निलेश राणे यांनी सांगितले.