गटारात आढळला मृतदेह,: वेंगसर नजीक घटना

वैभववाडी | प्रतिनिधी : वेंगसर शिंदेवाडीनजीक रस्त्याच्या बाजूला विश्वनाथ नारायण सकपाळ वय ५५ रा.हातदे ता. राजापूर जि.रत्नागिरी हे मृतावस्थेत आढळून आले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६. वा.सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

मयत विश्वनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी ११ वा.बेपत्ता झाले होते. त्यांचे नातेवाईक शोधाशोध करीत होते. मयताच्या भावाने वेंगसर उपसरपंच समाधान गुरव यांना भाऊ बेपत्ता झाला आहे. कुठे दिसला तर माहीती दया असे सांगितले होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी  वेंगसर शिंदेवाडीनजीक रस्त्याच्या गटारात एक अनोळखी व्यक्ती पडलेली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. माहीती मिळताच वेंगसर पोलिस पाटील सुनिल कांबळे, अतुल सरवटे, उपसरपंच यांनी घटनास्थळी जाऊन खाञी करुन वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली.

तर उपसरपंच यांनी मयताच्या भावाशी संपर्क साधत एक व्यक्ती गटारात पडलेली आहे. आपण येऊन खाञी करा असे सांगितले. त्यानुसार त्यांचा भाऊ व नातेवाईक घटनास्थळी येऊन पाहीले असता मयताची ओळख पटली. दरम्यान वैभववाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक श्री.खोत, पोलिस हवालदार शैलेश कांबळे आदी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणण्यात आला.अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.