कणकवलीतील बंद बंगल्याकडे अज्ञात चोरट्यांनी केले लक्ष

२३,३०० रुपयांचा मुद्देमाल गेला चोरीला

कणकवली : तालुक्यातील तरंदळे येथील पारिजात बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरातील अत्यावश्यक वस्तूंची चोरी झाली तर या चोरीमध्ये एकूण २३,३०० रु. चा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळून आले.

 

याबाबत घरमालक सुशील हनुमंत सावंत ( वय ५० सध्या रा. मुंबई ) मूळ गाव तरंदळे पटेलवाडी. घरमालक हे नोकरीनिमित्त मुंबई येथे असतात, ते १९ फेब्रुवारी २०२१ ला बंगला बंद करून मुंबई येथे गेले होते. बुधवारी कणकवली येथे ते आले होते. आल्यावर त्यांना घराची परिस्थिती काहीशी वेगळी वाटली. त्यामुळे त्यांनी संपूर्ण बंगल्याची पहाणी केली. यावेळी त्यांना बंगल्याचा मागील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसून आला. घरात पहाणी केल्यावर घरातील बरेच सामान हे चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली. याबाबत अधिक तपास कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस चंद्रकांत माने करत आहेत.