खेड(प्रतिनिधी) लम्पीसदृश आढळले असून त्यातील ६३ जनावरांवर तातडीने उपचार करण्यात आल्याने बरे झाले आहेत. सद्यस्थितीत केवळ ४ जनावरे लम्पीबाधित आहेत. तरी साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची मोहीम गतिमान करण्यात आली आहे.
तालुक्यात २४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्या मार्फत लंपी जनावरावर उपचार केले जात आहेत पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण करण्याची मोहीम तातडीने हाती घेतली आहे. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत २८,३६९ जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. एस. राऊत यांनी दिली
जनावरे मोकाट सोडली जात असल्यामुळेच लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यानी जनावरे मोकाट न सोडता अन्य जनावरे सोबत न ठेवता विलगीकरणात ठेवावीत. पशुपालकांनी गोठ्यात, जंतूनाशक फवारणी करावी, लम्पी रोग झालेल्या जनावरांचे दूध पिणे आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले आहे.











