रंगोत्सव नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये केंद्रशाळा सुरंगपाणीचे दैदिप्यमान यश

सप्टेंबर 2023 मध्ये आयोजित केलेल्या रंगोत्सव नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये केंद्रशाळा सुरंगपाणी च्या विद्यार्थ्यांनी आठ गोल्ड मेडल व पाच ब्राँझ मेडल प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये वैभवी शैलेश गोवेकर वैष्णवी शैलेश गोवेकर पलाश प्रवीण , रिया गोविंद पेडणेकर,विराज संतोष भगत, दिव्या सत्यब्रम्ह पंडित, दिप्तेय सत्यब्रह्म पंडित,प्रसिद्धी निवृत्ती पेडणेकर या दिद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक अविष्कारालून घवघवीत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे निवड इंटरनॅशनल लेवलवर करण्यात आली आहे.

शालेय शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती माता पालक समिती व शिक्षक पालक समिती तर्फे अभिनंदन करण्यात आले.तसेच त्यांना नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका तथा मार्गदर्शक श्रीम शामल मांजरेकर – पिळणकर यांचेही अभिनंदन करण्यात आले.