विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दूल कलाम यांचे विचार अंगिकारावे : श्रद्धा सावंत

कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा

सावंतवाडी । प्रतिनिधी :

भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचे विचार आपण अंगिकारले पाहिजेत. त्यांनी आपल्या लहानपणातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करून प्रसंगी वृत्तपत्रे विकून आपले शिक्षण पुर्ण केले होते. शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष व त्यांचे विचार आजच्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थीनी व प्रत्येक व्यक्तीनेही आत्मसात करायला हवेत, असे आवाहन मळगांव हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत यांनी केले.

दरम्यान, वाचनातून ज्ञान मिळते. ते ज्ञान मिळविण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यानी वाचन मंदिरात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने संपन्न झालेल्या माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सहाव्या जयंती दिन व वाचन प्रेरणा दिन प्रसंगी उपस्थित वाचक व विद्यार्थी-विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

या वाचनमंदिरामुळे मलाही खुप फायदा झाला होता व आजही होत आहे. वाचन मंदिरातील जवळजवळ सर्वच पुस्तके आपण वाचली आहेत. तुम्हीही या वाचन मंदिराचे सभासद व्हा व जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करा.पुस्तकांमधूनच ज्ञान मिळते. ते ज्ञान अंगिकारा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी या वाचन मंदिरतर्फ राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतूक केले.

या कार्यक्रमास मळगांव हायस्कुलचे माजी शिक्षक बी.एन.सामंत, शुभांगी

धर्मा, वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, वाचनालयाचे कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, संचालक तथा माजी मुख्याद्यापक बाळकृष्ण मुळीक, सौ.स्नेहा खानोलकर, महेश पंतवालवलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, ग्रंथपाल आनंद देवळी, पत्रकार सुखदेव राऊळ, समाजभुषण पुरस्कार विजेते चंद्रकांत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर तसेच मळगांव इंग्लिश स्कूलचे आजी विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बी.एन. सामंत सर यांनी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थीनी वाचक यांना मार्गदर्शन करताना आजच्या पिढीतील विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना,दुरदर्शन संच,मोबाईल यासारख्या आधुनीक साधनांद्वारे हवी ती माहिती मिळत आहे. काही वर्षांपुर्वी आम्हांला या वाचन मंदिरातील पुस्तके,वर्तमान पत्रे यामधून माहिती मिळत होती.आज मळगांव मध्ये सुरु असलेल्या या वाचन मंदिरामुळे मळगांव मधील वाचकांसहीत आजूबाजूच्या गावातील व मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे, अशा शब्दात वाचन मंदिराचे व वाचन मंदिर कार्यकारीणीचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी श्रद्धा सावंत, वाचनमंदिरामध्ये वर्षभर चांगले वाचन केलेल्या वाचक बी.एल्.सामंत,शुभांगी धर्मा, संगीता मेस्त्री, निलेश मुळीक, राज तळणकर, याज्ञिका साटेलकर यांचा एक पुस्तक व रोख रक्कम देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळीवाचन मंदिराचे विद्यमान अध्यक्ष हेमंत खानोलकर व कार्यवाहक गुरुनाथ नार्वेकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हेमंत खानोलकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.

Sindhudurg