आमदार नितेश राणे यांचा टोला
कणकवली : जनतेच्या आंदोलनाची आमचे केंद्र सरकार दखल घेईल.लोकांचे जीव वाचवणे साठी सरकार प्राधान्य देत आहे.पण ह्या निमित्ताने सरकार वर टिका करणाऱ्या संजय राऊत यांनी थोडे तरी त्यांच्या मालकाच्या मुलाच्या कारणाम्याकडे बघितले असते तर ‘हिट ॲन्ड रन’बद्दल बोलण्याची त्यांची हिंमत झाली नसती. आता किती कुठे कुठे ‘हिट’ झालाय कुठुन कुठुन ‘रन’ झालाय याची यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये ते फिरु पण शकणार नाहीत.दिशा सालीयान केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसे तिथून पळुन गेले हे आता पोलिस चौकशीमध्ये बाहेर येणारच आहे. त्यामुळे हिट अन्ड रन केसवर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत आणि त्याच्या मालकाला नाही.
‘हिट ॲन्ड रन’ कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे त्या कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात. त्याबद्दल आमचे केंद्र सरकार विचारही करेल. एका २०२२ मधले आकडे बघितले तर ४७ हजार लोकानी या हिट ॲन्ड रन मुळे आपला जीव गमावलेला आहे. या सगळ्याबद्दल केंद्रसरकार म्हणून त्या दिशेने काही होत असेल तर त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांना सरकारवर टिका करण्याचे काही कारण नाही. शेवटी लोकांचा जीव वाचवणे ही आमच्या केंद्रसरकारची प्राथमिकता आहे. त्याबद्दल आमचे केद्रसरकार निश्चित पध्दतीने विचार करेल,असे भाजप आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
‘सामना’ मध्ये काशी कलंकीत झाली आहे. या बाबतीत अग्रलेख लिहिलेला आहे. काशी कलंकित ख-या अर्थाने कधी झाली ? तर काही आठवड्या अगोदर राऊत यांच्या मालकाचा मुलगा जो आपल्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी काशीला गेला होता. त्यामुळे काशीमध्ये ख-या अर्थाने गौमुत्र शिंपडण्याची वेळ आली होती. काशीला शुध्द ठेवण्याचे काम आमचे हिंदुत्व आणि राज्य सरकार निश्चितपणे करेल. पण त्यांच्या मालकाचा मुलगा काशी मध्ये येवून आपले पाप धुण्याचा जो काही प्रयत्न करतो तर त्याही बद्दल जर अग्रलेख लिहिलात तर बरे होईल.
भांडुप मध्ये बसुन सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि बैठकीतील वाटपाबद्दल बोलु नये . तुमची लायकी किती आहे हे तुम्हालाच माहित आहे. तुमच्या मालकाला कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठीनी खडसावलंय त्याची बातमी आमच्याकडे आहे. उध्दव ठाकरेंना म्हणे सक्त आदेश १० जनपथच्या मातोश्रींकडून आले आहेत. संजय राऊताचे थोबाड बंद करा म्हणून तंबी मिळाली आहे.
त्यानंतर एरंडेल पल्यासारखा चेहरा झालेला आहे. म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुमच्या मालकाची थोडी काही इज्जत जर ठेवायची असेल तर , दरदिवशी सकाळीच उघडणारे थोबाड बंद करा आणि एकदाचे घरी बसा,असा सल्लाही संजय राऊत यांना नितेश राणे यांनी दिला आहे.










