घुमडे वरचीवाडी येथे वडाला आग…

मालवण | प्रतिनिधी : घुमडे वरची वाडी गवळदेव प्राथमिक शाळा येथे एका वडाच्या झाडाला मंगळवारी सकाळी आग लागली. याबाबत माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी दीपक पाटकर यांच्या माध्यमातून मालवण नगरपालिकेशी संपर्क साधला. तात्काळ नप कर्मचारी अग्निशमन गाडीसह दाखल झाले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. प्रशांत बिरमोळे, दिलीप बिरमोळे व ग्रामस्थ तसेच नप कर्मचारी यांनी मदतकार्य करत आग विजवली.