खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील निळीक येथील सरपंच रोमाना चौगुले यांच्या निवासस्थानी शिव एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम के.जी.तील विद्यार्थ्यांचे फूड फेस्टीवल पार पडले.
या फेस्टीवलमध्ये गावातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी मुख्याध्यापक बंग, माजी सरपंच अ. रहेमान चौगुले, फरीद मुकादम, राशिद नोरे, अब्बासमियाँ चिकटे, डॉ. अ. लतिफ नोरे आदी उपस्थित होते.










