दापोली | प्रतिनिधी:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जानेवारी अखेरपर्यंत येणार असून अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई. के वाय.सी व आधार सीडिंग केले नसेल त्यांनी 15 जानेवारीच्या आत करून घेण्याचे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांची ई.केवायसी प्रलंबित आहे. त्यांनी जवळच्या महाईसेवा केंद्रात जाऊन ई. केवायसी पूर्ण करावी तसेच गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा ज्यांचे आधार कार्ड प्रलंबित आहे. अशा शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे .











