विजयदुर्ग (प्रतिनिधी ) पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून विजयदुर्ग कोस्टल पोलीसांनी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांनी भावी पिढी घडवणारे आजचे विद्यार्थ्यी अतिशय आवश्यक असणारी कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने हाताळू शकतात आणि पोलीसांना सहकार्य करून एक जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरू शकतात यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केलं.
यावेळी विजयदुर्ग हायस्कूलचे 50 विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. पोलिसांचे कर्तव्य करत असताना नागरिक आणि भावी पिढीला सामावून घेऊन पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांचा समन्वय साधण्याचा हा उपक्रम लोकांनाही भावला. याबाबत विजयदुर्ग सरपंच रियाज काझी यांनीही कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांचे कामकाज, हत्यार आदीची माहिती देऊन पोलीसांबद्दलची भिती या उपक्रमातून कमी करण्यात आली.










