खेड | प्रतिनिधी : कोल्हापूर रोटरी क्लब मिडटाऊन व येथील रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवली येथील मेजर ग.ह. पवार हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगावकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. वरूण मोदी, सेक्रेटरी मंदार संसारे, चिंचवली शाळेतील शिक्षक, कोल्हापूर येथील निवेदिता पवार, अॅड. सुधीर पवार आदी उपस्थित होते.










