खेड | प्रतिनिधी : गझल मंथन साहित्य संस्था- कोरपना (चंद्रपूर) द्वारा सर्वोत्कृष्ट मराठी गझल संग्रहाला पुरस्कृत करण्यात येणार आहे. या उत्कृष्ठ मराठी गझलसंग्रह गझल मंथन साहित्य संस्था- कोरपना (चंद्रपूर) द्वारा सर्वोत्कृष्ट मराठी गझल संग्रहाला पुरस्कृत करण्यात येणार आहे. या उत्कृष्ठ मराठी गझलसंग्रह पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११,१११ रूपयांचा धनादेश सन्मान चिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले गझलसंग्रह पाठवता येतील. गझलसंग्रहाचे परीक्षण महाराष्ट्रातील दोन मान्यवर जेष्ठ गझलकारांकडून तसेच द्रोणाचार्य सार्वजनिक वाचनालय कोरपनाच्या भाषा समिती सदस्यांकडून करण्यात येईल. पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठवण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९८२३६४५६५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.









