राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

 

मालवणात मनसे पदाधिकारी आक्रमक : पोलिसांचा हस्तक्षेप

मालवण | प्रतिनिधी : प्रभू श्री रामचंद्र यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा मालवण भरड नाका येथे संतप्त मनसैनिकांनी जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मालवण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप करत पुतळा बाजूला हटवला. यावेळी मनसैनिकांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी मनसे पदाधिकारी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मनसे मालवण तालुकाध्यक्ष युवा उद्योजक प्रीतम गावडे, उपतालुकाध्यक्ष पास्कोल रोड्रीक्स, विशाल ओटवणेकर, लौकिक मेथर, रोहन तावडे, साईश कीर, नितीन राठोड, राज शेलटकर, चिन्मय कुणकवळेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.