खाकीवर्दीने ठरवलं आणि चोरटे जेरबंद…!


कोणत्याही घटनेमध्ये पोलिसांनी मनात आणलं तर काहीही करू शकतात. काहीही घडू शकत. अनेकवेळा पोलिसांकडुन पोलिस तपास चालू आहे असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. सर्वसामान्य जनतेला पोलिस काहीच करत नाहीत असच वाटत रहात. त्यामुळे अनेकवेळा चोरी होऊनही ज्यांची चोरी होते ते देखिल पोलिसांत तक्रार कशाला करायची त्याचा काही उपयोगच होत नाही. यामुळे अनेकवेळा चोरी होऊनही पोलिसांकडे तक्रार करायला कोणी जात नाही. ४ एप्रिल २०२६ रोजी कणकवली शहरात एकाच रात्रीत १० दुकाने फोडली त्यानंतर ५ एप्रिलला सावंतवाडी शहरातील दुकाने फोडण्यात आली. यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांसमोर एक आव्हानव निर्माण झाले होते. कणकवली आणि सावंतवाडी शहरातील चोरी प्रकरणात सिंधुदुर्ग पोलिस अलर्ट झाले होते. सावंतवाडी, कणकवली पोलिस स्टेशनचे स्थानिक पोलिस तपास करत होतेच. परंतु सिंधुदुर्ग स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस टिमने या चोरी प्रकरणात अधिक गंभिरतेने लक्ष घातले. यात कणकवली, सावंतवाडी येथील चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यात एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक श्री.हडळ यांनी सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. कणकवली आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर चोरटे ४ एप्रिल रोजी पहाटे कणकवली रेल्वे स्टेशनला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी च्या पहाटे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला ते चोरटे दिसले. सकाळी ७.१५ वाजता सावंतवाडी रेल्वे स्टेशनला क्रॉसिंगसाठी नेत्रावती एक्सप्रेस थांबली त्या ट्रेनमध्ये चोरटे चढले हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निश्चित झाल्यावर पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ यांनी सावंतवाडी येथील रेल्वे पोलिसांमार्फत रोहा रेल्वे स्टेशन पोलिसांना अलर्ट करण्यात आले. तसेच रोहा पोलिस स्टेशनशी संपर्क साधून त्यांची सीसीटीव्ही फुटेजमधील छायाचित्रही पाठवण्यात आली. त्यानंतर रोहा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.पवार यांनी रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने राहुल उर्फ दिवाण ओमप्रकाश तोमर, राजपथ संतराम पाल अशी आरोपींची नावं आहेत. या दोन्ही संशयित चोरट्यांच्या मागावर रोहा आणि पनवेल पोलिस होतेच. एलसीबीचे पथक रायगड जिल्ह्यात रवाना होत. पोलिसांनी त्या चोरट्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे उत्तर प्रदेशचे आहेत.पंरतु गेल्या सोळा सतरा वर्षे आपल्या गावी गेलेच नाहीत .त्या दोघांकडेही मोबाईल आहेत परंतु ते दोघेही मोबाईल वापरत नाहीत.त्यामुळे या चोरट्यांचे मोबाईल लोकेशन सापडत नाही.शहरात चोरी करुन हे चोरटे रेल्वे स्टेशन गाठून पसार होण्यासाठी रेल्वेचा वापर करतात.शेवटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातल फूटेज महत्वाचे ठरले.चोरीचा तपास इतक्या गतीमानतेने होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत ज्या गतीने त्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चोरटे पोलिसांच्या अलगद जाळ्यात अडकले. चोरी करून चोरटे पहाटे रेल्वे स्टेशन गाठतात ही चोरटे कॉमन बाब समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्याद्वारे तपास करत चोरट्यांना जेरबंद केल्याने सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक डॉ.मोहन दहिकर आणि त्यांच्या एलसीबी च्या टिमची कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, पोलिस हवालदार श्री.गंगावणे, हवालदार श्री.कदम यांनी काम पाहिले. स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागाच्या टिमने चोरट्यांना ३० तासात ताब्यात घेतल्याने सर्वसामान्य जनतेचा खाकीवर्दीवर विश्वास वाढला आहे. पोलिसांनी कोणत्याही गुन्ह्यात मनावर घेतलं तर आरोपींपर्यंत पोहचून आरोपींना जेरबंद करू शकतात हे देखिल यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.
*(फोटो-न)दुकानफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या