वैभववाडी महोत्सवात दि. १३ रोजी होणार पुरस्काराचे वितरण
वैभववाडी | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या स्तरावर आपले मोलाचे योगदान देत असतात. यातील काही व्यक्तींचे कार्य हे उल्लेखनीय आहे. अशा व्यक्तींचा सन्मान करण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने यावर्षीचे पुरस्कार अध्यक्ष संजय रावराणे यांनी जाहीर केले आहेत.
जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – वैभवशाली शिक्षक पुरस्कार – मधुकर ज्ञानदेव पाटील, मुख्याध्यापक (मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवली), संतोष विठोबा मोरे पदवीधर शिक्षक (केंद्र शाळा हेत), श्रीमती ताई बाबुराव व्हणाले (उपशिक्षिका विद्या मंदिर करूळ गावठण अ), वैभवशाली कार्यकर्ता पुरस्कार श्री. मनोहर प्रभाकर नारकर ( रा. नाधवडे, वैभवशाली शेतकरी पुरस्कार श्री गुलजार काझी (रा. तिथवली), वैभवशाली उद्योजक पुरस्कार श्री. अवधूत आत्माराम मानकर (रा. वैभववाडी), वैभव गृहलक्ष्मी पुरस्कार सौ गीतांजली गिरधर रावराणे (रा. आचिर्णे), यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे यांनी दिली.
रोटरी क्लब वैभववाडीचे वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी रोटरियन संतोष टक्के, ऱोटरियन प्रशांत गुळेकर आदी उपस्थित होते.
वैभववाडी रोटरी क्लब वैभववाडी व नगरपंचायत वाभवे – वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी महोत्सवात हे पुरस्कार देण्यात येणार आहे. दि. 12, 13 व 14 जानेवारी रोजी हा महोत्सव संपन्न होत आहे. दि. 13 जानेवारी रोजी हे पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. तरी या महोत्सवाला तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने करण्यात आले आहे.











