रत्नागिरी : सन २०२३-२४ या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखून ठेवलेल्या ५% निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांनी दिली.
योजनेचे नाव-दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे. (पिठाची गिरण, शिलाई मशीन, मिर्ची कांडप मशीन, झेरॉक्स मशीन) विहीत नमुन्यातील अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय (सर्व) तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी/ त्यांचे पालकांनी कार्यालयाकडून अर्ज नमुना प्राप्त करुन घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव आपले गाव ज्या पंचायत समिती कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहे, त्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.











