लांजा( प्रतिनिधी) रत्न सिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरीय भव्य दिव्य राम – रावण युद्ध भव्य नृत्य स्पर्धेत देवधे येथील श्री नवलाई देवी नमन मंडळ हरमलेवाडी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
हातखंबा येथे पार पडलेल्या राम – रावण युद्ध भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक स्पर्धकानी भाग घेतला होता. या स्पर्धेत श्री नवलाई देवी नमन मंडळ हरमलेवाडी देवधे या मंडळाने उत्कृष्ट नृत्य व उत्कृष्ट युद्ध करून प्रथम क्रमांक मिळविला.
यामध्ये राम -विजय सोना हरमले, रावण – राजेंद्र गोविंद हरमले, पार्श्वगायक – विश्वनाथ गंगाराम हरमले, शाहीर विश्वनाथ हरवले; मृदुंग वादक – विराज गुणाजी हरमले, मृदुंग वादक – विराज गंगाराम हरमले, सावजी हरमले, ताशा वादक – प्रकाश महादेव घडशी, ढोल वादक – अभिजित रमेश गुरव, ढोल वादक – अजय टाकले, , टाळ वादक – सखाराम गोपाळ हरमले, झांज वादक -सचिन शांताराम हरमले तसेच प्रशांत हरमले, प्रदीप पाडावे; विनय हरमले, विशाल हरमले, मनिष हरमले, वर्षा हरमले, आयुष हरमले यांनी कलाकारांनी सहभाग घेतला होता.. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.












