भरणेतील “नील हाईट्स” इमारतीचे झाले स्ट्रक्चल ऑडिट… पहा काय आला अहवाल

खेड | प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील भरणे येथील “नील हाईटस” हि इमारत धोकादायक बनली असल्याचा दावा खोटा असून हि इमारत राष्ट्रीय महामार्ग विभागाने भूसंपादीत केली असून ती अर्धवट तोडण्यात आलेली आहे. मात्र इमारत स्ट्रक्चल ऑडिट ने फिट असल्याची बाब अहवाला नुसार स्पष्ट झाली असून तिला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा निल हाईट्स सहकारी गृह निर्माण संस्था भरणेच्या वतीने प्रसिद्धी पत्रका द्वारे देण्यात आला आहे

येथील राष्ट्रीय महामार्गावरील भरणे येथील “नील हाईटस” हि इमारत धोकादायक बनली असल्याचा दावा खोटा असून हि इमारत राष्ट्रीय महामार्ग विभागाने भूसंपादीत केली असून ती अर्धवट तोडण्यात आलेली आहे मात्र इमारत स्ट्रक्चल ऑडिटने फिट असल्याची बाब अहवाला नुसार स्पष्ट झाली असून तिला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा निल हाईट्स सहकारी गृह निर्माण संस्था भरणे च्या वतीने प्रसिद्धी पत्रका द्वारे देण्यात आला आहे.

भरणे जाधव वाडी येथील निल हाईट्स या इमारतीच्या विकासकांनी इमारतीतील मधील सर्व सदनिका / गाळे विकासकांनी त्यांना हव्या त्या किंमतीला विकल्यामुळे व येथे कायदेशीर रजिस्टर्ड गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आल्यामुळे इमारतीचे विकासक श्री. नितीन सुधाकर तलाठी यांचा येथील संपूर्ण मिळकतीशी (जमीन व इमारत) कसलाही संबंध राहिलेला नाही. असे असताना श्री. नितीन सुधाकर तलाठी बेदरकारपणे व कायद्याची कसलीही तमा न बाळगता स्वतःला जमीनीचे मालक म्हणून जाहीर करीत आहेत. ही बाब निषेधार्थ असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान अनधिकृतरित्या पैसे कमाविण्याच्या लालसेने नितीन सुधाकर तलाठी यांनी सदर गृहनिर्माण संस्थेला कसलीही कल्पना न देता व संपूर्ण बेकायदेशिरपणे शासनास केवळ १८० चौ. मी. जमीन अधिग्रहीत करावयाची असताना नील हाईटस अपार्टमेंट च्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण जमीन (१०२० चौ. मी.) अधिग्रहीत करण्यास परवानगि दिली व या संपूर्ण अधिग्रहीत जमीनीचा संपूर्ण मोबदला त्यांनी शासनाकडून बेकायदेशिररित्या मिळविला. आणि हे कृष्णकृत्य साध्य करण्यासाठी त्यांनी इमारत स्ट्रक्चरली अनफिट असल्याचे सांगितले. इमारतीतील बहुतांश सदनिकाधारकांनी इमारत केव्हाही कोसळेल या भितीने विकासक श्री. नितीन सुधाकर तलाठी यांनी देऊ केलेला केवळ सदनिकेचा तुटपुंजा मोबदला स्विकारला. याच बाबीचा गैरफायदा घेऊन विकासक श्री. नितीन सुधाकर तलाठी यांनी इमारत स्ट्रक्चरली अनफिट असल्यामुळे अस्तित्वातच नाही असे दाखवून संपूर्ण जमीनीचा मोबदला रजिस्टर्ड गृहनिर्माण संस्थेस अंधारात ठेवून व जमीनीशी त्यांचा काहीही संबंध नसताना, लाटला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे

या इमारतीत वास्तव्यास असणारी अनेक कुटूंबे अक्षरश: उघड्यावर पडल्या सारखी झाले आहेत. त्यांचे हक्क, जे रजिस्टर्ड गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून संरक्षित केले गेले होते, त्यांच्यापासून हिरावुनघेतले गेले आहेत. यातील काही कुटूंबानी घर विकत घेण्यासाठी घेतलेली बँकांची कर्जे अजूनही फिटलेली नाहीत. या गृहकर्जाचे हप्ते अजूनही चालू असून या कुटूंबाची अक्षरशः वाताहात लागलेली आहे.

विकासक श्री. नितीन सुधाकर तलाठी यांचे हे कृष्णकृत्य उघड करण्यासाठी नील हाईटस् सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी तर्फे अधिकृतरित्या चार्टर्ड आणि स्ट्रक्चरल ईंजिनिअर्स श्री. रविंद्र एम. पाटील यांची नेमणूक करून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आलेले आहे. या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट मध्ये श्री. रविंद्र एम. पाटील यांनी हे स्पष्ट केलेले आहे कि, इमारत मजबूत असून तिला कोणत्याही प्रकारचा धोका नाही व ती अधिवास करण्यास पुर्णपणे सुरक्षित आहे. ही बाब स्पष्ट झाली आहे

महामार्गावर अशा अनेक इमारती महामार्गा लगत जमीनीचा काही भाग अधिग्रहीत झाल्यामुळे ऊभ्या आहेत. आणि अशा इमारतींमध्ये रहिवाशी वास्तव्य करून आहेत. मग केवळ नील हाईटस अपार्टमेंटला वेगळा नियम का ? असा प्रश्न उपस्थित करून कायदेशीर कारवाई चा अवलंब केला जाणार असल्याचे म्हटले आहे.