चोरवणेतील श्री जुगादेवी मंदिरात उद्या आराधन कार्यक्रम व यात्रा

पाली | वार्ताहर : पाली नजीकच्या चोरवणे (ता.संगमेश्वर) येथील श्री जुगादेवी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे आराधन कार्यक्रम मंगळवार ता. ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणारआहे. त्याचप्रमाणे श्री विठलाई देवी यात्रा शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० पर्यंत होईल. तरी सर्व ग्रामस्थ आणि भक्तगण यांनी आवर्जून उपस्थित राहावे व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री विठलाई जत्रेसाठी वस्तूरूप किंवा पैशाच्या रूपात देणगी देण्यासाठी अथवा नवस फेडणाऱ्या मंडळींनी गावप्रमुख मंदार कात्रे ९९२३९२०२६५ किंवा गावकार सखाराम कांबळे यांचेशी संपर्क साधावा असे देवस्थानतर्फे आवाहन करण्यात आले आहे.