जानवळे येथील शिवसेनाप्रमुख क्रिकेट चषक पालशेतच्या दत्तकृपा संघाकडे

Google search engine
Google search engine

गुहागरच्या पिंपळादेवी संघाला उपविजेते पद

पाटपन्हाळे | वार्ताहर  : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा शिवसैनिक सचिन कोंडविलकर व त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिवसेना प्रमुख चषकावर तालुक्यातील पालशेतच्या दत्तकृपा संघाने नाव कोरले तर गुहागरच्या पिंपळादेवी संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. प्रथम विजेता संघाला रोख रुपये ११,१११/- व आकर्षक चषक, उपविजेता संघाला रोख रुपये ७, ७७७/- व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून जानवळेच्या सरपंच सौ. जान्हवी विखारे, विष्णुपंत पवार हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र पवार, गुहागर टाइम्सचे संपादक निसारखान सरगुरो, पत्रकार गणेश धनावडे, दिनेश चव्हाण, अब्दुल्ला सुबेदार, ग्रा.पं. सदस्य मंगेश कोंडविलकर, ग्रा.पं.सदस्या सौ. निलीमा जानवळकर, ग्रामदेवता विकास मंडळ अध्यक्ष श्री. भरत शितप, श्री. अर्जून शितप, ओंकार संसारे, गफ्फार मेमन, संतोष शितप, सुनिल जाधव, मोहनशेठ चव्हाण, कल्पेश गुहागरकर, शिवतेज भोसले, इरफान वणु, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिवर्षीप्रमाणे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मर्यादित ५ षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जानवळेच्या बौध्दवाडी क्रिडांगणावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण १६ संघानी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अंतिम सामना पालशेतच्या दत्तकृपा क्रिकेट संघ आणि गुहागरच्या पिंपळादेवी संघादरम्यान होऊन पालशेत संघाने अंतिम सामना पाच गडी राखून सहज विजय मिळविला. या स्पर्धेतील मालीकावीर म्हणून पंकज नार्वेकर, उत्कृष्ट फलंदाज राजकिरण बोले, उत्कृष्ट गोलंदाज महेश भोसले यांचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सन्मान करण्यात आला. या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे सुत्रसंचालन आणि धावतेवर्णन श्री. अतिम संसारे, श्री. सावंत सर, श्री.जाक्कर तसेच स्कोअर अहमद घारे यांनी तर पंच म्हणून श्री. बंधू मोहिते आणि स्वप्निल धामणस्कर यांनी काम पाहिले. स्पर्धा गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाली.