स्व. सुशिल आपा वेल्हाळ यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त जीवनज्योती विशेष शाळेस आर्थिक मदत

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील जेष्ठ समाजसेवक स्व. सुशिल (आप्पा) वेल्हाळ यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त शृंगारतळी पालपेणे रोड येथील ग्रामआधार स्वयंसेवी संस्थेची जीवनज्योती विशेष शाळा (मतीमंद मुलांचे प्रशिक्षण व पुर्नवसन केंद्र) या संस्थेला आर्थिक मदत देण्यात आली. सदर आर्थिक मदत स्व. सुशिल आप्पा वेल्हाळ यांच्या पत्नी सुचिता वेल्हाळ यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी गौरव वेल्हाळ, अवधुत वेल्हाळ, रमेश वेल्हाळ, माजी सरपंच संजय पवार, गुलामशेठ तांडेल, सुधीर टाणकर, वैभव वेल्हाळ, शाळेच्या मुख्या: सुषमा वासुदेव शिंदे, प्रविण तांबिटकर, स्नेहा आयरे आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी पालपेणे फाटा येथील स्वर्गीय सुशिल आप्पा वेल्हाळ चौक येथे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.