लांजा तालुका भाजपा कार्यालयाचे गुरुवारी ११ जानेवारी रोजी उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती

लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुका भाजपा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

लांजा शहरातील मारुती हार्डवेअरच्या वरच्या मजल्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्यासह भाजपाचे माजी खासदार निलेश राणे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

तरी लांजा शहर आणि तालुक्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर तसेच शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली यांनी केले आहे.