खेड | प्रतिनिधी : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजू चव्हाण तर सचिव पदी सिद्धेश परशेट्ये यांची सन २०२४ या वर्षा करिता सर्वानुमते निवड करण्यात आली मराठी पत्रकार दिनी ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली . संघाचे मावळते अद्यक्ष देवेंद्र जाधव यांचा कार्यकाळ संपल्याने नुतन कार्यकारणी निवडण्यात आली
निवडण्यात आलेल्या उर्वरित कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदी इकबाल जमादार, ज्ञानेश रोकडे सल्लगार पदी उत्तम जैन यांची निवड करण्यात आली आहे यावेळी गोविंद राठोड, सदानंद जंगम, किशोर साळवी, विनय माळी , इकबाल जमादार ,माजी अद्यक्ष देवेंद्र जाधव, हर्षल शिरोडकर , दिवाकर प्रभू ,अनुज जोशी सुरेश पवार, मंदार आपटे, दिलीप देवळेकर, नंदेश खेडेकर , उमेश खेडेकर, मुबिन नाडकर, प्रमोद आंब्रे, आदी पत्रकार उपस्थित होते











