खेड : राष्ट्रीय गो संमेलन 2024 मध्ये बोलताना केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे आगमन झाले. लोटे खेड येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोशाळेसाठी निलेश राणे यांनी नेहमीच सहकार्य केले त्यामुळेच गोशाळा इथे उभी आहे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीत निलेश राणे पाठीशी उभे राहिले. कोकणातील बेघर, जखमी गाईना इथे आश्रय दिले जाते. आम्हाला या गाईसाठी जागा हवी आहे. ज्यांच्या पाठीही राणे आहेत. त्यांना कोणाचीही भीती नसते. तसें आम्ही खंबीर आहोत. आम्हाला अपेक्षा नाहीय, फक्त पाठीशी राहा इतकेच महत्वाचे आहे. असे प्रतिपादन या संमेलनात कोकरे महाराज यांनी केले












