पत्रकार जगदीश कदम यांचे निधन

रत्नागिरी : दै.पुढारीचे लांजा येथील पत्रकार जगदीश कदम यांचे दि.9 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे अल्पश: आजाराने निधन झाले. ते 41 वर्षांचे होते.

गेली 20 वर्षांहून अधिककाळ ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. चिपळूण, गुहागर येथे पत्रकारिता केल्यानंतर गेली अनेक वर्ष लांजा येथे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. दै. तरुण भारत आणि दै. प्रहार मध्येही त्यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. हरहुन्नरी पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. सामाजिक कामही मोठ्या हिरीरिने करत असत. त्यांचे 9 जानेवारी रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.