धामणंद विभागातील १० सरपंचांचा शिंदे गटात प्रवेश

Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला रामदास कदम यांची अनोखी भेट

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील धामणंद विभागातील ठाकरे गटातील दहा सरपंचांनी असंख्य शिवसैनिकांसह बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटात प्रवेश केला.हा प्रवेश म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाची अनोखी भेट असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

रामदास कदम यावेळी म्हणाले की, २० वर्षांनी मी पंधरा गांव धामणंद विभागातील सहयाद्रीच्या छायेतील निवे, सार्पिली, पोसरे, धामणंदसह बायें आदि २२ गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्यासाठी हा दोन दिवसाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान जनतेचे माझ्यावरील प्रेम आणि जिव्हाळा अद्यापही कायम असल्याचे ठिकठिकाणी स्वागत करून ग्रामस्थांनी दाखवून दिले.

आपली बाधिलकी विकासाशी आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदार संघातील खाडीपट्टयातील गावांसह धामणंद १५ गाव
विभागातील गावच्या विकासाची कामे राबविणे ही माझी जबाबदारी आहे. या विभागातील गावात विकासाची कामे राबविण्यात वचन बध्द असल्याने
तालुक्यातील वावेतर्फे खेड मधील सरपंच महेश उतेकर, साखर विक्रम विजय शिंदे, सार्पिली सुरेखा जयवंत पालांडे, मुसाड मयुरी संदीप निर्मळ, कोतवली
अनता महेश तांबे, कुरवळजावळी स्वाती शशिकांत उतेकर, धामणंद राजू भिकाजी वाघमारे, पोतरे सतिदा सलिम खेरटकर, चिरणी पांडुरंग
जानकर, चोरवणे अश्विनी बाळू मेस्त्री अशा १० ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंत्र यांनी बाळासाहेबांची शिवसेना जाहीर प्रवेश केल्याची माहिती दिली.

यावेळी सहदेव बेटकर, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत कदम, तालुकाप्रमुख अरुण कदम, आदि मान्यवर
उपस्थित होते.