खेड BREAKING : चाप्टर केस मिटवून देतो अस सांगत ३ हजाराची लाच स्वीकारणारा महसूल सहाय्यक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात 

खेड | प्रतिनिधी : चाप्टर केस मिटवून देतो अस सांगत त्याबदल्यात ३ हजार रुपये मागणी करत ती स्वीकारताना खेड तहसीलदार कार्यालयातील चंपलाल महाजन डेढवाल या महसूल सहाय्यकाला रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे खेड महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे चाप्टर केस सुरु आहे. ती मिटवून देतो असे सांगून यातील खेड तहसीलदार कार्यालयातील आरोपी लोकसेवक चंपलाल महाजन डेढवाल (५२) या महसूल सहाय्यकाणे २८/१२/२०२३ रोजी ३०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाच ]लुचपत विभागाकडे संपर्क साधला होता. त्याप्रमाणे सापळा रचत चंपलाल महाजन डेढवाल याला रक्कम ३०००/- रुपये लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 

 

▶️ *सापळा पथक -*

पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला ,

पोहवा. संतोष कोळेकर ,

पोहवा.विशाल नलावडे.

पो. ना. दिपक आंबेकर

पो.कॉ. हेमंत पवार

▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी*

श्री सुशांत चव्हाण

पोलीस उपाधीक्षक

अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी .

 

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*

*मा.श्री. सुनिल लोखंडे सो,

पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*

*मा.श्री.अनिल घेरडीकर सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

*मा.श्री.सुधाकर सुराडकर सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

▶️ तपासी अधिकारी

शहानवाज मुल्ला, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी