कणकवली महाविद्यालयात खाद्य महोत्सव

कल्चरल डे ‘ निमित्त ब्लॅक अँड व्हाईट डे साजरा

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू यांनी यावेळी खाद्य महोत्सवास भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयात ‘कल्चरल डे ‘ ची धूम सुरू झाली. आहे. आज ब्लॅक अँड व्हाईट डे निमित्त विद्यार्थी सजलेले होते.

यावेळी ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र मुंबरकर,इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभागाच्या प्रमुख प्रा.प्रियांका लोकरे – प्रभू,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कला, वाणिज्य ,विज्ञान व बँफ या विविध विद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. स्टॉल वर विविध खाद्यपदार्थ खाद्यपदार्थाचा आनंद विद्यार्थी घेत आहेत.सकाळी १०.

०० ते दुपारी १२.०० या वेळेमध्ये हा खाद्य महोत्सव असून या महोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. प्रियांका लोकरे – प्रभू यांनी केले आहे.