कणकवली I मयुर ठाकूर : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असतानाच एकीकडे मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावे लागत असल्याच्या घटना कणकवलीत घडत आहेत. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जाणवली येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका गायीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे ही गाय गाभण असल्याने आणि अपघातात गायीचे पोट फाडले गेल्याने गायीचे वासरू रस्त्यावर पडलेे होते.हे हृदय द्रावक दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. मात्र या अपघातानंतर बेदरकारपणे रस्त्यावर सोडण्यात येणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोडून दिल्या जाणाऱ्या जनावरांच्या मालकांविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
An unknown vehicle collided on the Mumbai-Goa highway; Cow and calf also died..!
मुंबई गोवा महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाटपणे सोडून दिली जाणारी जनावरे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली येथे एका अज्ञात वाहनाने गाईला धडक दिली या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला .ही गाय गाभण असल्याने अपघातात जबरदस्त मार लागल्याने अपघातानंतर गाईच्या पोटातील वासरू रस्त्यावरच मृतावस्थेत पडले होते. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जाणवली गावचे पोलीस पाटील मोहन सावंत यांनी घटनास्थळी येत ट्रॅक्टर मागवून घेत गाय व तिच्या वासराला ट्रॅक्टरमध्ये भरून दुसरीकडे हलविले.
गेल्या चार दिवसात दोन ठिकाणी अशा प्रकारचे अपघात घडले असून यात वाहनांना दोष देता येत नाही तर आपल्या जनावरांची काळजी न घेता सोडून दिल्या जाणाऱ्या जनावरांना आपले प्राण गमवावे लागत आहेत .यात दोष त्या मुक्या जनावरांचा अथवा वाहनधारकांचा नसून याला बेजबाबदारपणे जनावरे सोडून दिल्या जाणाऱ्या मालकांचा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे निदान या पुढच्या काळात तरी जनावरांच्या मालकानी आपली जनावरे सांभाळावीत अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत होती.